वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(वाममार्गी शाक्तांचा

🙏 3. संत तुकाराम · ABH-080695 · अभंग क्र. ३४६४

3464.
(वाममार्गी शाक्तांचा निषेध शाक्ता वरील अभंग)
वारिता बळे धरिता हाती । जुलुमे जाती नरकामधी ॥१॥
रंडीदासाप्रति काही । उपदेश तो ही चालेना ॥धृपद॥
जन्म गेला वाताहात । थोर घात येठायी ॥२॥
तुका म्हणे पंढरीनाथा । तुझी कथा दूषीती ॥३॥

अर्थ :
शाक्त उपासक लोकांना असे कर्म करु नका असे जरी सांगितले त्यांच्या हाताला धरुन जरी त्यांना त्या कर्मापासून मागे ओढले तरी ते ऐकत नाही बळजबरीने ते नरकामध्ये जातातच. अशा या शाक्त भक्तांना रंडीचे दास असणाऱ्या भक्तांना कितीही उपदेश केला तरी ते ऐकत नाही त्यांच्यापुढे कोणतेही उपदेश चालत नाहीत. अशा या शाक्त उपासकांना कितीही उपदेश केला तरी त्यांच्यापुढे काही चालत नाही यांचा जन्म व्यर्थ जाऊन त्यांच्या जन्माची वाताहातच म्हणजे हानीच होते आणि ते स्वत:चा मोठा घात करुन घेतात. तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरीनाथा तुझ्या कथेला हे लोक नांव ठेवतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग