राहोनि भोंवती नामावा
1740.
राहोनि भोंवती नामावाटे पाहे | श्वास न समाये दुःखे पोटी ॥१॥
म्हणती मायेने वैर साधियले | विषयो बुडालो सांगो कोणा ॥२॥
भक्ता अंतरंग देतोसी तू देवा | मेटसि केशवा पूर्ण स्थिती ॥३॥
पूर्ण पान्हा धेनु घालीत वोरसे | वत्स थोर हर्षे पान करी ॥४॥
देखोनि मे स्वामी बळेंचि वोढिले | तळमळीत ठेले थोर आशा ॥५॥
कृपणे संपत्ति जोडिलीया राशी | हिरोनिया घेती बळियाने ॥६॥
आळवी करुणा धांवे दाहि दिशा | तैसे हृषिकेशा जाले मज ॥७॥
क्षुधाक्रांत जेवि भोजनी बैसले | कोणासी न बोले मातु कांहि ॥८॥
उठविते वेळी नव्हतांचि तृप्ति | तैसी दुःखप्राप्ति जाली मज ॥९॥
अघोर संसार मोहो महापुरी | अखंड मुरारी सुखरूप ॥१०॥
नामा म्हणे विठो अनाथाच्या बंधु देई सुखसिंधु मज आता ॥११॥
