वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 193. मागणे

माझे व्रत एक चालवी व

🙏 4. संत नामदेव · ABH-082584 · अभंग क्र. १७४१

1741.
माझे व्रत एक चालवी विठ्ठला | सकळा घटी तुला देखे ऐसे ॥१॥
तई माझे चित्त पावे समाधान | नाही तरी जिणे काय व्यर्थ ॥२॥
तुझी कास आणि बुडे महापुरी | ऐसे होता हरि लाज कोणा ॥३॥
मागितले फार तुज काय देवा | नको वा केशवा मीतूंपण ॥४॥
नामा म्हणे माझा कैवारी सबळ | असोनिया काळ भोगू काशा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग