वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 193. मागणे

पतितपावन नाम ऐकुनी आ

🙏 4. संत नामदेव · ABH-082596 · अभंग क्र. १७३९

1739.
पतितपावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा | पतितपावन नव्हेसी म्हणुनी जातो माघारा ॥१॥
घ्यावे तेव्हा द्यावे ऐसा अससी उदार | काय धरूनि देवा तुझे कृपणाचे द्वार ॥२॥
सोडी ब्रीद देवा आता नव्हेसि अभिमानी | पतितपावन नाम तुझे ठेवियले कोणी ॥३॥
झेंगट घेउनी हाती दवंडी पिटीन तिही लोकी | पतितपावन देवा परी तू मोठा घातकी ॥४॥
नामा म्हणे देवा तुझे न लगे मज कांही | प्रेम असोंदे चित्ती म्हणुनी लागतसे पायी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग