निंबलोण करू पंढरीच्य
397.
निंबलोण करू पंढरीच्या सुखा |आणिक पुंडलिका मायबापा ॥१॥
पाहता भूमंडळी नाही आणिक रे |पांडुरंग क्षेत्रावांचोनीया ॥२॥
अणिमादि सिद्धि भक्ताचिये दारी |होऊनि कामारि वोळंगति ॥३॥
पललोकींची येती परतोनि मागुते |सर्व सुख तेथे भोगावया ॥४॥
मुक्ती पद कोणी नेघे फुकासाठी |हिंडे वाळवंटी दीनरूप ॥५॥
भक्ताचिया पाया पडे पुढतो पुढती |मज करा सांगाती मोक्ष म्हणे ॥६॥
सत्य लोकी जया सुखाची शिराणी |ते आम्हा अनुदिनी प्रत्यक्ष दिसे ॥७॥
बंदीजन नामा उभा महाद्वारी |कीर्ति चराचरी वर्णितसे ॥८॥
