वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 137. पंढरी महात्म्य

पंढरीचे सुख जिही अनु

🙏 4. संत नामदेव · ABH-082962 · अभंग क्र. ३९८

398.
पंढरीचे सुख जिही अनुभविलें|भावे अनुसरले विठ्ठलपायीं॥१॥
काया वाचा मन रंगले चरणी|धरियेला मनी पांडुरंग॥२॥
नामाचेनि बळे उडविली साधनें|तोडीली बंधने संसाराची॥३॥
योगियांचे घर रिघे काकुलती|आव्हेरिले संती म्हणोनियां॥४॥
दोन्ही कर जोडोनि मोक्ष पाहे वास|म्हणे मी होईन दास हरिदासाचा॥५॥
तंव तुच्छ करोनी न पाहाती दृष्टि|आपंगिले शेवटी ब्रह्मज्ञानीं॥६॥
अष्ट महासिद्धी म्हणती कवण गति|यावे काकुलती कवणा आम्ही|७|
मोक्ष मुक्ति जिही हाणितल्या पायीं|आमुची ते सोयी काय धरिती|८|
ऐसी सर्व जीवा त्रीदेवासी पूज्य|ते एक राज्य केले पुंडलिकें॥९॥
हर्षे निर्भर नामा नाचे महाद्वारीं|मुखी निरंतरी नामघोष॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग