जाणत्या नेणत्या हाचि
710.
जाणत्या नेणत्या हाचि उपदेश । विठ्ठल वाचे जप सुखें करा ॥१॥
न करा साधन वाउगाची शीण । विठ्ठलरुपीं मन निमग्न राहो ॥२॥
भलतिया परी विठ्ठलासी गाये । सुखा उणें काय तुजाला आहे ॥३॥
जन्ममरणा तुटे आधिव्याधी । विठ्ठलनामें सिद्धि पाया लागे ॥४॥
एका जनार्दनी जपतां विठ्ठल । न लगे तया मोल धन कांही ॥५॥
