वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079774 · अभंग क्र. ३८९८

3898.
(बाळक्रीडा अभंग)
चिंतीले पावली जया कृष्णभेटी । एरवी ते आटी वायाविण ॥१॥
वासना धरिती कृष्णाविणे काही । सीण केला तिही साधनांचा ॥२॥
चाळविले दंभे एक अहंकारे । भोग जन्मांतरे न चुकती ॥३॥
न चुकती भोग तपे दाने व्रते । एका त्या अनंतेंवाचूनिया ॥४॥
चुकवुनि जन्म दाखवी आपणा । भजा नारायण तुका म्हणे ॥५॥

अर्थ :
जो कोणी कृष्णाचरणाचे चिंतन करतो त्यालाच कृष्ण भेट होते नाहीतर इतर कोणतेही साधने केली तरी ते व्यर्थच ठरतात. कृष्णावाचून कोणत्याही इच्छा मनात धरल्या आणि कोणत्याही साधनांचा वापर केला तर तो व्यर्थ त्रासच ठरतो. दंभ आणि अहंकार या गोष्टीमुळे कितीतरी लोक चाळवले गेलेले आहेत आणि यामुळेच त्यांचे भोग आणि जन्ममरणाच्या फे-या कधीही चुकत नाही. एका अनंतावाचून कोणाचेही तप, दान, व्रत, भोग चुकणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, केवळ एक नारायणच आपल्याला आपले जन्ममरण चुकवून दाखवू शकतात त्यामुळे तुम्ही त्यालाच नित्य भजा त्याचेच नित्य ध्यान करा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग