वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079695 · अभंग क्र. ३८९९

3899.
(बाळक्रीडा अभंग)
भजल्या गोपिका सर्व भावे देवा । नाही चित्ती हेवा दुजा काही ॥१॥
दुजा छंदु नाही तयांचिये मनी । जागृति स्वप्नी कृष्णध्यान ॥२॥
ध्यान ज्या हरीचे हरीसि तयांचे । चित्त ग्वाही ज्यांचे तैशा भावे ॥३॥
भाग्ये पूर्वपुण्ये आठविती लोक । अवघे सकळिक मथुरेचे ॥४॥
मथुरेचे लोक सुखी केले जन । तेथे नारायण राज्य करी ॥५॥
राज्य करी गोपीयादवांसहित । कर्मिले बहुतकाळ तेथे ॥६॥
तेथे दैत्यी उपसर्ग केला लोका । रचिली द्वारका तुका म्हणे ॥७॥

अर्थ :
गोपीका सर्व भावे देवालाच म्हणजे कृष्णालाच भजतात त्यांच्या चित्तामध्ये देवावाचून दुसरे कोणत्याही गोष्टीविषयी हेवा नाही. त्यांच्या मनामध्ये कृष्णावाचून इतर कोणताही छंद नव्हता, जागृती आणि स्वप्नांमध्येही त्या कृष्णाचेच ध्यान करीत होत्या. जे लोक आपल्या चित्तामध्ये नेहमी हरीचे ध्यान करतात त्यांचेच ध्यान हरी नेहमी करत असतो आणि आपण हरीचे चिंतन नेहमी करतो की नाही याला आपले मनच साक्षी आहे. मथुरेच्या सर्व लोकांचे काहीतरी पूर्व पुण्य होते, भाग्य होते त्यामुळेच तर ते नेहमी देवाचे चिंतन करत होते. अशा प्रकारे देवाने मथुरेच्या लोकांना सुखी करुन तेथे नारायणाने राज्य केले. गोपी आणि यादवा सहीत देवाने मथुरेत राज्य केले व खूप काळ तेथे राहिले. तुकाराम महाराज म्हणतात, परंतु तेथे दैत्यांनी लोकांना खूप उपसर्ग केला म्हणजे त्रास दिला त्यामुळे देवाने व्दारका स्थापित केली.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग