गोपींची प्राणांतिक अ
155.
गोपींची प्राणांतिक अवस्था.
जोडोनिया हात येतो काकुळती । धांब कृपामूर्ति आम्हांलागी ॥१॥
अवतार घेसी दुष्ट वधायासी । येती गोकुळासी म्हणोनिया ॥२॥
पाहोनिया तुला लक्षुमी पातली । दरिद्रे पळाली येथोनिया ॥३॥
सकळांसी सुख द्यावया आलासी । आम्ही वनवासी दु:खी होतो ॥४॥
नामा म्हणे कंठी धरियेला प्राण । दाखवी चरण दयानिधी ॥५॥
