रामकृष्णांचे मौजी बं
195.
रामकृष्णांचे मौजी बंधने
चारी वेदा ज्याचा नयेचि उमज । करीतसे मुंज वसु-देव ॥१॥
कर्दळीचे स्तंभे वाडे शृंगारिले । गर्गासी धाडिले आणा-वया ॥२॥
देशोदेशी चिठया लिहिल्या वसुदेवे । मुंजीसीठी यावे कृष्णजीच्या ॥३॥
मथुरेचे लोक आणिती आहेर । होतसे गजर वाजंत्रांचा ॥४॥
उग्रसेने तेव्हा फोडिले भांडार । द्विजांसी अपार द्रव्य दिल्हे ॥५॥
विष्णुदास नामा वांटितो सुपारी । झाले ब्रह्मचारी रामकृष्ण ॥६॥
