माझिया पितयाचा होईल
389.
माझिया पितयाचा होईल निद्राभंग |न घडे प्रसंग बोलायाचा ॥१॥
क्षण एक मौन धरूनिया रहा |शरणागत पहा क्रुपाद्रुष्टि ॥२॥
करूनि निर्धार आलेती जेणे भावे |जतन करावे वचन देवा ॥३॥
नवजावे देवा माझे गांवेहुनि |मागतो प्रार्थुनी हेंचि तुम्हा ॥४॥
माझे सुख पहावे मागेन ते द्यावे |माझे गावी व्हावे अधिपती ॥५॥
नामयाचा स्वामी भक्तीसी भुलला |पुंडलिके राहिला पंढरीये ॥६॥
