वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 136. श्रीविठ्ठल व पुंडलिक यांचा संवाद

आलासी आरते धरिलासी च

🙏 4. संत नामदेव · ABH-083528 · अभंग क्र. ३९०

390.
आलासी आरते धरिलासी चित्ते |आता तुज मागुते जावो नेदी ॥१॥
शरीर प्राणाचा देईन मी बळी |तुज हॄदयकमळी सांठवीन ॥२॥
धरिलासी तू एक वैकुंठनायक |म्हणे पुंडलिक पांडुरंगा ॥३॥
इहलोकीचे सुख न मगे सकळिक |आणिक परलोकी चाड नाही ॥४॥
पंढरीस राही रुक्माई समवेत |तेणे मनोरथ पूर्ण होती ॥५॥
तुझे रूप द्रुष्टी नामस्मरण पुटी |मना चरणी मिठी पडोनि गेली ॥६॥
तुझे चरणी आर्त हॄदयी नामाम्रुत |तेणे मी समर्थ मिरवे जगी ॥७॥
संता सोयरिया व्हावयासि भेटी |म्हणोनि वाळवंटी वस्ती केली ॥८॥
परब्रह्म पुतळा देखिलासि डोळा |समाधि सुख सोहळा पांडुरंगा ॥९॥
कटी ठेवूनि हात आपण पंढरीनाथ |भक्तांचा एकांत श्रवण करी ॥१०॥
उभारे म्हणोनि दिधले आपणांते |संबोखोनि नाम्याते प्रेम दिले ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग