देवकी निज उदरी । गर्
6.
देवकी निज उदरी । गर्भाजी पाहे थोरी । तंव सबाह्म अभ्यंतरीं । व्यापक श्रीकृष्ण ॥१॥ अगे हा स्वतः सिद्ध हरी । स्वयंप्रकाश करी । मीपणा माझारी । गर्भु वाढे ॥२॥ आता नवल कैसे परी । आठवा गर्भु धरी । त्याहि गर्भा माझारीं मज मी देखे ॥३॥ दाहीं इंद्रियां माझारीं । गर्भांची वाढे थोरी । कर्म तदाकारीं । इंद्रिय वृत्ति ॥४॥ चितप्रकाशासी डोहळे । सद्रूप सोहळे । आनंद कल्लोळे गर्भू वाढे ॥५॥ तेथे स्वस्वरुपस्थिती सुखरुप प्रसुती । आनंद त्रिजगती परिपूर्ण ॥६॥ एका जनार्दनी । ज्ञानगर्भु सार । चिद्रुप चराचर । निखळ नांदे ॥७॥
