वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 135. श्रीनिवृत्तिनाथांची स्तुति - अभंग ३४८८ ते ३५०६

श्रीनिवृत्तिनाथांची

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085335 · अभंग क्र. ३४८८

3488.
श्रीनिवृत्तिनाथांची स्तुति - अभंग ३४८८ ते ३५०६

विश्वाचा तो गुरु । स्वामी निवृत्ति दातारु ॥१॥
आदिनाथापासून । परंपरा आली जाण ॥२॥
ज्ञानदेवा ज्ञान दिले । चांगदेवाते बोधिले ॥३॥
तोचि बोध माझे मनी । राहो एका जनार्दनी ॥४॥
‍३४८९.
केला उपकार जगी तारियेले सर्व । निवृत्ति गुरु माझा जीव उध्दरिले सर्व ॥१॥
कायावाचामनें शरण निवृत्तिपायीं । देहभावें मीतूंपणा उरलाची नाही ॥२॥
ऐसा श्रीनिवृत्ति ज्ञानदेवें धरिला चित्ती । चांगया प्रेम दिधले गुरु वोळखिला चित्ती ॥३॥
एका जनार्दनी शरण निवृत्तिप्रती । संसार नुरेचि उरी निवृत्ति म्हणता चित्ती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग