संचिताचे पूरे वाहावल
474.
संचिताचे पूरे वाहावले होते ।
नाम हे अवचिते सापडले ॥१॥
धरूनी आधार निघाले बाहेरी ।
जालासी कैवारी पांडुरंगा ॥२॥
अविद्येच्या डोही होते मी बुडाले ।
नाम तुझे जाले तारू मज ॥३॥
बहेणि म्हणे भ्रम-भवरीया आत ।
जात जीव तेथ नाम आले ॥४॥
