भीमानिकटदेशी ।
473.
भीमानिकटदेशी ।
तू पुंडलिका वर देसी ।
जडजीवतारक, परियेसी ।
पांडुरंगा ॥१॥
कटी कर ठेवुनि, वचने ।
उद्धरसी जगरचने ।
साधुसंगती धावसी सुचने ।
तू पांडुरंगा ॥२॥
न दिसे योगतपे सहसा ।
मुक्तिपद हरि तू विरसा ।
बहेणि म्हणे दीनतारका जगदीशा ।
तू पांडुरंगा ॥३॥
