भ्रमाचिया सर्पे डंखि
475.
भ्रमाचिया सर्पे डंखियेले मज ।
धाव चतुर्भुज गारोडिया ॥१॥
पाहतोसी काय जीवहत्या शिरी ।
पडेल निर्धारी पांडुरंगा ॥२॥
विषयवाघुरे सापडले आत ।
कामाग्नीही तेथ साह्य जाला ॥३॥
बहेणि म्हणे व्याधे करूनि सिद्ध बाण ।
लाविला निर्वाण पाहू नको॥४
