नाही लाग माग । न देख
419.
नाही लाग माग । न देखेसे झाले जग ॥१॥
आता बैसोनिया खावे । दिले आइते या देवे ॥धृपद॥
निवारिले भय । नाही दुसऱ्याची सोय ॥२॥
तुका म्हणे काही । बोलायाचे काम नाही ॥३॥
अर्थ :
ज्या ठिकाणी जाऊन मला जगच दिसणार नाही आणि ज्या मार्गाचा मागमूसही कोणाला लागणार नाही अशा ठिकाणी देवाने मला बसविले आहे (सच्चिदानंदपद). अशी हि आयती स्वरूप देणगी देवाने दिल्या मुळे आता मी जगाच्याजागीच बसून तो आनंद उपभोगतो. त्या ठिकाणी भय मुळीच नाही कारण भयाचे मुळ म्हणजे द्वैत, त्याचा तेथे संबंधच येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता बोलण्याचे कामच उरले नाही
