तुझा दास मज म्हणती अ
420.
तुझा दास मज म्हणती अंकित । अवघे सकळिक लहान थोर ॥१॥
हेचि आता लागे करावे जतन । तुझे थोरपण तुज देवा ॥धृपद॥
होउनी निर्भर राहिलो निश्चिंत । पावनपतित नाम तुझे ॥२॥
करिता तुज होय डोंगराची राई । न लागता काही पात्या पाते ॥३॥
तुका म्हणे तुज काय ते अशक्य । तारिता मशक मज दीना ॥४॥
अर्थ :
देवा मी तुझा अंकित दास आहे असे सर्वच लहानथोर म्हणत आहेत. देवा आता तुला हा आपला मोठे पणा राखला पाहिजे. पतितपावन असे तुझे नांव आहे. हे जाणून मी निश्चिंत पणे राहिलो आहे. तुझा पराक्रम असा आहे कि, पापणी लावते न लावते तेवढ्यात तू डोंगराची राई करशील (मोठे पापही नष्ट करशील). तुकाराम महाराज म्हणतात मी तर ऐखाद्या मशका प्रमाणे शुल्लक आहे, दिन आहे असे असताना मला तरणे तुला अश्यक्य आहे का ?
