वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 246. सटवाई ३९१७

सटवाई ३९१७

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084765 · अभंग क्र. ३९१७

3917.
सटवाई ३९१७

नमो आदिमाया भगवती । हरिहरध्यानाची आकृती । चंद्रसुर्य कानी लोळतीं । गळावैजयंती शोभती । बया बैस ॥१॥ आली आली रेसटवाईआली ॥धृ.॥ पांच दगडमांडुनी । वर शेंदुरआरादुनी । माथा मुगुट शोभुनी । दारवंटा पुजुनी । बया बैस ॥२॥ लिंबे नारळांनी । पुजा पुजी सटवाईम्हणुनी । नवसा पावेलची ती कर जोडुनी । बयाबैस ॥३॥ चहुं वर्णाची याती । अठराजण कपाळीलावीती विभुती । निवद बोन करिती । वर पाळणाटांगिती । बया बैस ॥४॥ कामक्रोध बकरी मारुनी । चैत्रमासी होम करूनी । रावण कुंभकर्णहिरण्यकश्यपुची आहुती देऊनीं । अंबा अष्टांगबसुनी । बया बैस॥५॥अष्टगण दिक्पाळ । तेहतीस कोटी भुतावळ । अठ्याऐंशी सहस्त्र मेळ । ज्ञान टेंबा पाजळोन । बया बैस॥६॥ अंबेचीवर्णावया कांती । घटींघटस्थान करिती । पुढे वेताळभैरव नाचती । वैष्णव मेळी कल्लोळ करिती । बयाबैस॥७॥नऊ खंडे पृथ्वीवरी उभी राहुनी । नऊअवतार नटुनी । शेवटी प्रगट रुपे धरूंनी । कलंकीमाजी समुळ नाश करूंनी । बया बैस ॥८॥ उदो उदोशब्द गाजुनी । राऊळी भक्तहांकांमारुनीदारवंटा हात जोडुनी । अंबास्तवीली प्रीती करुनी । बया बैस ॥९॥ मग झाली अंबा प्रसन्न । सावळेरूप प्रगटोन । एका जनार्दनी नेम धरून । गेलीसंतांसी दर्शन देऊन । बैसविली स्वयंभुस्थानी । बया बैस ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग