वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

गगनी ध्रुव तुवा अढळ

🙏 4. संत नामदेव · ABH-083761 · अभंग क्र. ४९२

492.
गगनी ध्रुव तुवा अढळ पै केला । तो बाळ धाकुला न ह्मणसी ॥१॥
अजामेळाचे तुवा चुकविले संकट । ब्राह्मण तो नष्ट न ह्मणसी ॥२॥
प्रर्‍हादाचा तुवा केला कैवारु । वैर्‍याचा कुमरु न म्हणसी ॥३॥
गजेमद्रपशू सोडविला पानडिये । मृगखोडी ऐसिये न ह्मणसी ॥४॥
रुक्मांगदाची तुव उद्धरिली नगरी । विषयी मुरारी न ह्मणसी तया ॥५॥
ऐसे अपराधी न ह्मणसी देवा । नामा तो केशवा विनवीतसे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग