खगावरी स्वारी करूनिय
493.
खगावरी स्वारी करूनिया देवा । धांवसी केशवा भक्तांसाठी ॥१॥
रामा परशुरामा कृष्णा नारायणा । हरी संकर्षणा भक्तांसाठी ॥२॥
बिभीषण तारी रावणासी मारी । दावी भाव हरी भक्तांसाठी ॥३॥
नामा ह्मणे भक्तांकारणेम गोविंदा । घेवोनिया गदा उभा ठायी ॥४॥
