कोडियाचे गोरेपण । तै
3364.
कोडियाचे गोरेपण । तैसे अहंकारीज्ञान ॥१॥
त्यासि आता रिझे कोण । जवळी जाता चीळसवाणे ॥धृपद॥
प्रेतदेह गौरविले । तैसे विटंबवाणे झाले ॥२॥
तुका म्हणे खाणे विष्ठा । तैशा देहबुद्धीचेष्टा ॥३॥
अर्थ :
कोड फुटलेल्या मनुष्याला जसे ठिकठिकाणी गोरेपणा आलेला असतो पण तो व्यर्थ ठरतो त्याप्रमाणे अहंकारी मनुष्याला ज्ञान जरी झाले तरी ते व्यर्थच ठरते. आता त्याच्याजवळ कोणीही जाईन कारण त्याच्याजवळ गेले की किळस येते त्याप्रमाणे मनुष्याला ज्ञान जरी प्राप्त झाले परंतू अहंकार जर त्याच्यामध्ये असेल तर संत त्याच्याजवळ तो कधीही जाणार नाही. प्रेताच्या देहाला कितीही श्रृंगारले तरी ते व्यर्थ ठरते अगदी त्याप्रमाणे अहंकारी मनुष्याला कितीही ज्ञान झाले तरी ते विटंबनाचेच कारण ठरते. तुकाराम महाराज म्हणतात, एखादयाने देहालाच आत्मा समजणे म्हणजे एक चेष्टेचाच प्रकार तो ठरतो जसे एखादया मनुष्याने विष्ठा खाण्यासारखे घाणरेडी क्रिया करणे त्याप्रमाणेच देहाला आत्मा समजून कोणतेही कर्म केले तरी ते वाईटच कर्म ठरते.
