सर्वसुखा अधिकारी । म
3363.
सर्वसुखा अधिकारी । मुखे उच्चारी हरिनाम ॥१॥
सर्वांगे तो सर्वोत्तम । मुखी नाम हरीचे ॥धृपद॥
ऐशी उभारिली बाहे । वेदी पाहे पुराणी ॥२॥
तुका म्हणे येथे काही । संदेह नाही भरवसा ॥३॥
अर्थ :
मुखाने नेहमी हरीनामाचा उच्चार करणाराच सर्व सुखाचा अधिकारी आहे. ज्याच्या मुखामध्ये हरीचे नाम आहे तो सर्वांगाने सर्वोत्तम आहे. असे वेदाने आणि पुराणाने आपले दोन्हीही बाहू वर करुन सांगितले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, येथे कोणत्याही प्रकारचा संदेहच येत नाही मी जे काही सांगतो आहे त्याच्यावर तुम्ही भरवसा ठेवा.
