उपजले विटाळी मेले ते
280.
उपजले विटाळी मेले ते विटाळी । रहिले विटाळी ते ही जाती ॥१॥
रडती पडती ते ही वेगे मरती 1 परि नाम न गाती भुली भ्रमे ॥२॥
कायरे हा देह सुखाचा तयासी । उघडाचि जासी अंतकाळी ॥३॥
चोखा म्हणे याचा न धरी भरंवसा । अंती यम फांसा गळा पडे ॥४॥
