कोण तो सोंवळा कोण तो
279.
कोण तो सोंवळा कोण तो वोंवळा । दोन्हींच्या वेगळा विठ्ठल माझा ॥१॥
कोणाची विटाळ कशाचा जाहला । मुळींचा संचला सोंवळाची ॥२॥
पांचांचा विटाळ येकाचिये आंगा । सोंवळा तो जगामाजी कोण ॥३॥
चोखा म्हणे माझा विठ्ठल सोंवळा । अरूपे आगळा विटेवरी ॥४॥
