वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

प्राणिया एक बीजमंत्र

🙏 3. संत तुकाराम · ABH-079767 · अभंग क्र. ३९५१

3951.
प्राणिया एक बीजमंत्र उच्चारी । प्रतिदिनी रामकृष्ण म्हणे का मुरारि ॥१॥
हेचि साधन रे तुज सर्व सिद्धींचे । नाम उच्चारी रे गोपाळाचे वाचे ॥धृपद॥
उपास पारणे न लगे वनसेवन । न लगे धूम्रपान पंचाग्नितापणे ॥२॥
सुखाचे फुकाचे काही न वेचे भांडार । कोटीयज्ञांपरिस तुका म्हणे हे सार ॥३॥

अर्थ :
हे प्राण्या तू प्रतिदिनी प्रत्येक दिवशी रामकृष्ण मुरारी या बीजमंत्राचाच उच्चार कर. हेच तुझ्या सर्व सिध्दीचे साधन आहे वाचेने गोपाळाचे नामस्मरण सतत करत राहावे. या व्यतिरिक्त उपास पारणे किंवा वनात जाऊन रहाणे हे काहीही लागत नाही पंचाग्नीता तसेच धुम्रपान हे देखील काहीही करावे लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अरे प्राण्या सुखाचे आणि फुकटचे असे, हरीचे नाम आहे त्या हरीनामाचा भांडार तुम्ही लुटा यासाठी तुम्हाला काहीही खर्च करावे लागत नाही कोटी यज्ञापेक्षा सारभूत हरीचे एक नाम आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग