वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

विठ्ठल कीर्तनाचे अंत

🙏 3. संत तुकाराम · ABH-079425 · अभंग क्र. ३९५०

3950.
विठ्ठल कीर्तनाचे अंती । जय जय हरी जे म्हणती ॥१॥
ते चि सुकृताचे फळ । वाचा रामनामे निखळ ॥धृपद॥
बैसोनि हरीकथेसी । होय सावध चित्तासी ॥२॥
तुका म्हणे त्याचा जन्म । सुफळ झाला भवश्रम ॥३॥

अर्थ :
विठ्ठलाच्या किर्तनाच्या शेवटी जय जय हरी असे जे म्हणतात, तेच त्यांच्या सुकृताचे फळ आहे वाचेने ते केवळ रामनामच घेतात. हरीकथेला बसून चित्त सावध करावे. तुकाराम महाराज म्हणतात, जे असे वागतात त्यांचा जन्म सफल झाला आणि त्यांचे भवश्रम नाहीसे झाले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग