वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

न चलवे पंथ वचन नसता

🙏 3. संत तुकाराम · ABH-079548 · अभंग क्र. ३९५२

3952.
न चलवे पंथ वचन नसता पालवी । शरीर विटंबिले वाटे भीक मागावी ॥१॥
न करी रे तैसे आपआपणा । नित्य राम राम तुम्ही सकळहि म्हणा ॥धृपद॥
राम म्हणविता रांडा पोरे निरविशी । पडसी यमा हांती जाचविती चौऱ्यांशी ॥२॥
मुखी नाही राम तो ही आत्महत्यारा । तुका म्हणे लाज नाही तया गंव्हारा ॥३॥

अर्थ :
कोणत्याही गावाकडे मार्गस्थ असताना जर आपल्याजवळ वचनाचे गाठोडे नसेल तर आपल्याला मार्ग चालवणार नाही म्हणजे मार्ग चालत असताना कुणाला विचारल्याशिवाय आपल्याला हव्या त्या गावाकडे जाता येणार नाही आणि आपल्याजवळ जर आपली शिदोरी नसेल तर वाटेत आपली फजिती होऊन आपल्याला भीक मागावी लागेल. त्याप्रमाणे तुम्ही आपल्या ठिकाणी असे करुन घेऊ नका म्हणजे तुम्ही जीवनमार्ग चालत असताना नुसते चालू नका तर मुखाने राम राम असे सर्वकाळ तुम्ही सर्वजण म्हणत राहा. एखादया मनुष्याला जर सांगितले की, तू राम राम स्मरण करत राहा तर तो म्हणतो की, आमच्या बायका पोरांचे पालनपोषण तुम्ही करा मग आम्ही राम राम असे म्हणू परंतु जर त्याने नामस्मरण जर केले नाही तर त्याला चौ-याऐंशी लक्ष योनीच्या फे-या जाचवतील. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या मुखामध्ये रामनाम स्मरण नाही तो आत्महत्यारा असून त्या गावंढळाला कोणत्याही प्रकारची लाज, लज्जा नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग