काढीतसे दृष्टी संदपि
199.
काढीतसे दृष्टी संदपिनपत्नी । न वर्णवे वाणी हर्ष तिचा ॥१॥
असे कांही इच्छा मागावे आणीक । दिल्हे हे बाळक ह्मणती दोघे ॥२॥
अहर्निशी तुझ्या असावे कल्याण । आले रामकृष्ण मथुरेसी ॥३॥
कृतांतासी धाक नामा ह्मणे त्याचा । आहे मी तयाचा शरणागत ॥४॥
