बहुती वर्णिला बहुती
537.
बहुती वर्णिला बहुती ध्याईला । परी तो पाहिल्या पुंडलिका ॥१॥
करुनी कैवाड उभा केला नीट । धरुनी दोन्ही कट करी देखा ॥२॥
पंचमहापातकी येताती ज्या भावे । दरुशने त्या द्यावे वैकुंठ पद ॥३॥
एका जनार्दनी भक्तांचा अंकीत । उभाचि तिष्ठत अठ्ठावीस युगें ॥४॥
