सखी पुसे सखियेसी । य
538.
सखी पुसे सखियेसी । युगें जाली अठ्ठावीसी । उभा ऐकिला संतामुखीं ।
अद्यापीं वर । कटावरी कर । भीवरी तीर । वाळूवंटी संतसभा सभा ॥१॥
देव काहां विटेवरी उभा उभा ॥धृ.॥
पुंसु नका बाई । वेदासी काई । कळलेंचि नाही ।
शेष शिणला जाहल्या द्विसहस्त्र जिभा जिभा ॥२॥
जेथे करीताती गोपाळाकाला । हरिनामी तयांचा गलबला ।
देवभावाचा भुकेला । मिळले संत मदनारी । तो हरी आला तयांचिया लोभा ॥३॥
हरी वैकुंठाहुनी । आला पुंडलिका लागुनी । उभा राहिला अझुनी ।
युगानुयुगें भक्तासंगें । एका जनार्दनी संतशोभा शोभा ॥४॥
