पंचबाणे माझे हृदय भे
697.
पंचबाणे माझे हृदय भेदले ।
पाचेवीण पावले चाही सांडूनिया ॥१॥
सकळे माझे गोत मुसे आले ।
ब्रह्मरसे जाले बाईये वो ॥२॥
बापरखुमादेविवरू ब्रह्मरसे विवळला ।
मजसहित निमाला ब्रह्मरूपी गे माये ॥३॥
अर्थ :
पंचबाणे म्हणजे शब्दादिक पाच विषयाने माझे हृदय भेदून टाकले होते. परंतु मी त्या विषयांचा व विषयासी व्यवहार करणाऱ्या मन, बुद्धि, चित्त, अहंकार या चौघांचा त्याग करून ब्रह्मस्वरूपांच्या ठिकाणी पावले. आता माझे सर्व गोत त्या ब्रह्मस्वरूपांतच आले. आणि ब्रह्मरसाने मी तृप्त झाले. माझे पिता व रखुमादेवीच् पती जे श्रीविठ्ठल ते ब्रह्मरसाच्या रूपाने उदयाला येऊन माझ्या जीवपणासह वर्तमान ब्रह्मरूपात लय पावले. असे माऊली सांगतात.
