वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

साता व्योमापरते पाहो

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074361 · अभंग क्र. ६९८

698.
साता व्योमापरते पाहो गेले ।
तव पाहाणेचि जाले ब्रह्म उदधी ॥१॥
साट मोट माझी मोट बांधिली ।
नेऊनि टाकिली निर्गुणी गे माये ॥२॥
बापरखुमादेविवरू पंचविसावा देखिला ।
तोही खुंटला तये पंथी ॥३॥

अर्थ :
ज्ञानसाधने पंचज्ञानेंद्रिये मन व बुद्धि मिळून असणारे सात हेच कोणी व्योम म्हणजे आकाश अशी कल्पना करून त्याच्यापलीकडे असणाऱ्या ब्रह्मस्वरूप समुद्राला पाहू गेले. तो मी ब्रह्मसमुद्रच होऊन राहिले. साट मोट म्हणजे सर्व अनात्मपदार्थाचे गाठोडे बांधून त्या निर्गुण ब्रह्मस्वरूपांत नेऊन टाकली. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल सांख्यांच्या चोवीस तत्त्वांहून निराळे असणारे, जो आत्मा तोही त्या विठ्ठलस्वरूपांत बुडाला. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग