मन वाचा बंदु निर्वाण
696.
मन वाचा बंदु निर्वाणी घांतले ।
निर्माण होते माझे ठायी माल्हाथिले ॥१॥
चंचळ मन ब्रह्मी निश्चळ जाले ।
अवघेचि निमाले ब्रह्मार्पणी ॥२॥
रखुमादेविवरू विठ्ठलु उघडा ।
व्योम पांघुरे फुडा देखोनी धाले ॥३॥
अर्थ :
माझ्या ठिकाणी असलेले मन व वाणी यांना मी बंधनांत टाकून मोक्षमार्गाला लावले. तेंव्हाच ते चंचळ मन माझे स्वरूप जे ब्रह्म त्याच्या ठिकाणी निश्चळ झाले. त्या ब्रह्मापर्णाच्या योगाने मन मावळून गेले असे नाही तर सर्व जगत मावळले. मग रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल जे आकाशाचेही पांघरूण असलेले, त्यामना मी उघडा स्वच्छ पाहून तृप्त झालो असे माऊली सांगतात.
