विठ्ठल देवाधिदेवो ।
473.
विठ्ठल देवाधिदेवो । भक्तजनांचे निवारी बिहो । तो पंढरीचा रावो । विटे उभा ठाकला ॥१॥
मना लागो त्याचा छंद । निरसोनि भेदाभेद । अवघाचि गोविंद । ठसावें हदयीं ॥२॥
स्नान केया चंद्रभागें । पातकें नासतील वेगे । संकल्प विकल्प त्याग । दरुशन घेतांची ॥३॥
ऐसा घडता हा नेम । तयापाशी पुरुषोत्तम । एका जनार्दनी काम । देव करी स्वयं अंगे ॥४॥
