वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

विष्ठा भक्षी तया अमृ

🙏 3. संत तुकाराम · ABH-078197 · अभंग क्र. २१५०

2150.
विष्ठा भक्षी तया अमृत पारिखे । वोंगळसी सखे वोंगळाची ॥१॥
नये पाहो काही गोहवाडीचा अंत । झणी ठाका संत दुर्जनापे ॥धृपद॥
भेंसळीच्या बीजा अमंगळ गुण । उपजवी सीण दरुषणे ॥२॥
तुका म्हणे छी थू जया घरी धन । तेथे ते कारण कासयाचे ॥३॥

अर्थ :
विष्टा खाणाऱ्याला अमृत फार परके असते त्याप्रमाणे वाईट माणसांची संगती हे वाईटच माणसे करतात. ज्याप्रमाणे गुखाडीचा अंत पाहू नये त्याप्रमाणे संत लोकांनी दुर्जनाला जवळ देखील उभा करू नये. जे भेसळ युक्त बीजाने उत्पन्न झालेले जे प्राणी आहेत त्यांच्या अंगी अमंगळ गुणच असतात आणि त्यांच्या दर्शनाने देखील शीनच उत्पन्न होत राहतो. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या घरी लोकांची छि थू हेच धन आहे मग तेथे जाण्याचे कारणच काय, कारण तेथे जाऊन कोणालाच काहीच फायदा होत नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग