वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 149. श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा

नामा न राहे खेद करू

🙏 4. संत नामदेव · ABH-081717 · अभंग क्र. ९९५

995.
नामा न राहे खेद करू | केशव ठेवी अभय करू | म्हणे तू दु:खिया होसी थोरू| ज्ञानदेवाकारणे ॥१॥
धन्य धन्य तुम्ही भक्त | नित्य विष्णुचरणी रत | पुण्यशील भागवत | ज्ञानदेव नामया ॥२॥
तुमचेनि जग हे क्रुतार्थ | कवित्वे तरेल हे सत्य | मायामोहो निरसे समस्त | नामस्मरणे तुमचेनी ॥३॥
धन्य ज्ञानदेव ज्ञानशीळ | ज्ञानदेवा ऐसा सुढाळ | मी न देखे भूमंडळ | सकळही पाहता ॥४॥
तू करिसी खेद त्याचा | तरी तो आत्मा माझा साचा | भाव सांडी सांडी द्वैताचा | निखळ स्वरूप पाहे पा ॥५॥
तुम्ही भक्त अवघे आवडते | तुमचेनि साजिरे पूर्णचित्ते | मज पंढरिये येणे आवडते | नाम गाताती ये प्रीती ॥६॥
पुंडलिक माझा भक्त सखा | परी प्रेमळ तुम्ही विशेषा | तुमचेनि सर्व दु:खा | हरणे मी हे जाणावे ॥७॥
नामा म्हणे ज्ञानदेवाचे | मज दरूषण होईल साचे | तरीच रंगणी मी नाचे | हरिकीर्तनी पंढरिये ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग