वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 149. श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा

ऐसे परियेसिले विठ्ठल

🙏 4. संत नामदेव · ABH-081706 · अभंग क्र. ९९६

996.
ऐसे परियेसिले विठ्ठले | तंव रूक्मिणीने विनविले | यांचे करिजो जी म्हणितले | हाकारिजो पुंडलिका ॥१॥
धन्य धन्य धरातळी | वोळले वोळले वनमाळी | वैष्णवी पिटली टाळी | जयजय शब्दे करूनिया ॥२॥
गरूडासी सांगे केशव | कैसा भेटे यासी ज्ञानदेव | पुंडलिकासी जाऊनी सर्व | व्रुत्तांत सांगे येथींचा ॥३॥
तेणे नमस्कारूनि हरी | निघाल्या पक्षाच्या फडात्कारी | भेटला पुंडलिका झडकरी | यथाविधी सांगितले ॥४॥
पुंडलिके विस्मित चित्ती | म्हणे धन्य धन्य ज्ञानमूर्ती | ज्या कारणे वैकुंठपती | आळंकापुरीसी गेले ॥५॥
धन्य धन्य विठोबाचे चरण | धन्य धन्य माझे नयन | धन्य नामा रूपी संपन्न | विष्णु भक्त माझा सखा ॥६॥
मग गरूडासि पूजिले | ज्ञानदेवा हाकारिले | दिव्य विमानी बैसविले |चला म्हणितले आळंकापुरीसी ॥७॥
नामा असे खेद करीत | केशव तयासी संबोखित | तुम्हा दोघांचा येकांत |माझेनि संगे पुरेल ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग