वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 149. श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा

तंव नावेक श्रीहरी |त

🙏 4. संत नामदेव · ABH-081692 · अभंग क्र. ९९४

994.
तंव नावेक श्रीहरी |तटस्थ घटिका चा-ही| ध्यान धरूनी अंतरी |निश्चळ राहिला ॥१॥
जयजयशब्द नामा वोभाये | केशवा त्राहे त्राहे | मी व्याकुळ होत आहे | ज्ञानदेवाकारणे ॥२॥
नारायणा त्राहे त्राहे | क्रुपाद्रुष्टी तू रे पाहे |मी व्याकुळ होत आहे |ज्ञानदेवाकारणे ॥३॥
तुझेनि दर्श़ने | ज्ञानाचेनि अवलोकने |मज पंढरीस असणे |तुझे चरणी गा विठ्ठला ॥४॥
आता मज तू सांभाळी | ज्ञानदेवेंवीण सदाकाळी | मज न कंठे भूमंडळी |भानुसहित वर्तता ॥५॥
तू माझी जनक जननी | परि ज्ञानदेवेंवीण मेदिनी | शून्य वाटे हे धरणी | जैसे मत्स्य जीवनेंविण ॥६॥
तू रक्षिता सर्व जीवांसी | तरी का दुःख दिधले आम्हांसी | तू जवळी असता ह्रषिकेशी | ऐसी दशा हे प्राप्त ॥७॥
नामा खेदे क्षीण जाला जीवे | तंव नेत्र उघडिले देवे | आलिंगला केशवे | चा-ही भुजा पसरूनी ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग