वृंदावन रास क्रीडा
149.
वृंदावन रास क्रीडा
लोपता आदित्य पडे चंद्रप्रभा । वृंदावनी शोभा सुशो-भित ॥१॥
देहुडा पाउली उभा तये वनी । वेणू चक्रपाणी वाजवितो ॥२॥
ऐकतांचि नाद गोकुळींच्या नारी । पाहावया हरि निघताती ॥३॥
भ्रतार सेजेसी टाकुनी उठती । वाढिता पंगती निघताती ॥४॥
स्तन देता बाळे टाकिली भूमीसी । मोकळिया केशी निघताती ॥५॥
नामा ह्मणे ऐशा गेल्या देवापाशी । आनंद मानसी न समाये ॥६॥
