वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ३, नामसंकीर्तन महात्म्य > अभंग ८५ ते १०९

सुकुमार वेल्हाळ रूपे

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075201 · अभंग क्र. १०१

101.
सुकुमार वेल्हाळ रूपे पै सुंदर ।
तोचि पै आगर नंदाघरी ॥
अवघ्या सुख देतु अवघ्या दिवटे ।
अवघेचि पेठे हरिनाम ॥
यापरी आगरू कृष्णनाम ठसा ।
ओतला सरिसा भाग्ययोगे ।
बाप निवृत्तिराज उपदेशिती आम्हा ।
ज्ञानदेवा महिमा नामे आला ॥

अर्थ :
सुकुमार, वेल्हाळ असा सुंदर परमात्मा हाच त्या नंदाच्या घराचे आगर आहे. तो दिवटा बनुन सुखपथाचा हरिनामीमार्ग भक्तीच्या बाजारापर्यंत दाखवतो. हाच हरिनामाचा ठसा भाग्ययोगाने आमच्या वर ओतला गेला आहे. निवृत्तिनाथांनी पित्याप्रमाणे केलेल्या उपदेशामुळे तो नाम महिमी मला माहिती झाला असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग