वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ३, नामसंकीर्तन महात्म्य > अभंग ८५ ते १०९

कापुराचे कलेवर घातले

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075181 · अभंग क्र. १००

100.
कापुराचे कलेवर घातले करंडा ।
शेखी नुरेचि उंडा पहावया ॥
मा ज्योती मेळे कैसा उरेल कोळिसा ।
भावे ह्रषीकेशा भजता ऐसे ॥
ज्ञानदेव म्हणे वासना हे खोटी ।
नामयज्ञे मिठी दिधलिया विरे ॥

अर्थ :
हवेत विरणाऱ्या कापुराचे अलंकार बनवुन जरी करंड्यात जपुन ठेवले तरी ते विरुन जातात. तसेच कोळश्यानी अग्नी जवळ केला की कोळसेपणा राहात नाही तद्वत जीवाने हृषीकेशाचे भजन केले की जीवपणा राहात नाही. जीवपणात सर्वात खोटी वासना आहे परंतु नामयज्ञाची मीठी जीवाला पडली की ती वासना जीवपणा सकट नष्ट होते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग