वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ३, नामसंकीर्तन महात्म्य > अभंग ८५ ते १०९

ज्याचेनि तेजे तेजेस

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075202 · अभंग क्र. १०२

102.
ज्याचेनि तेजे तेजेस रविग्रह ।
त्याचेनि मोह निरसति ॥
ते नाम परिकर कृष्णचि सुंदर ।
वैकुंठीचे घर आम्ही केले ॥
जपता नाम स्मरता पै हरि हरि ।
प्रपंच बोहरी कृष्णनामे ॥
निवृत्ति सांगे ज्ञाना कृष्णचि नयना ।
सर्वीसर्वत्र पान्हा कृष्णरूपे ॥

अर्थ :
ज्याच्या तेजाने सुर्य चंद्र प्रकाशित होतात त्याच्या नामस्मरणांने मोहाचा निरास होतो. तेच पावन नाम घेत घेत आम्ही त्या वैकुंठालाच आमचे घर बनवले. त्या कृष्णनामाचा जप करत आम्ही प्रपंचाचा निरास केला. निवृत्तिनाथ सांगतात ज्ञाना त्या कृष्णाची नजर पडली की त्या कृष्णनामाचा प्रेमपान्हा सर्वत्र जाणवतो. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग