वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

रेखिले निढळी केशरी ट

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089919 · अभंग क्र. १५६

156.
रेखिले निढळी केशरी टिळक ।
तयावरी कस्तुरी परम सुरेख ।
उत्तम कुंकूं जाउळी देख ।
लाविलिया आरक्त अक्षता ॥१॥
मग तो चंदन मलयागर ।
चर्चिला सुवासित अति परिकर ।
यावरी काढुनी सुमनाहार ।
उभयता कंठी ओपिले ॥२॥
तुरे खोविले मस्तकावरी ।
तेणे शोभले बळरामहरी ।
मग ठेवूनिया चरणांवरी ।
मस्तक नमू उभी ठेली ॥३॥
कृष्ण बोलिले प्रसन्नोत्तर ।
कुब्जे तुझा केला अंगिकार ।
निळा म्हणे तदाकार ।
वृत्ति झाली कुब्जेची ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग