वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

राया जाणविती सेवक ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089901 · अभंग क्र. १५७

157.
राया जाणविती सेवक ।
अक्रूरे आणिला नंदबाळक ।
तेणं मर्दुनी बळिया रजक ।
धनुर्यागही भंगिला ॥१॥
आता येऊनिया चौबारी ।
उभा रंगशिळेवरी ।
अवघ्या पाहाती नगरनारी ।
लोकपरिवारी मिळोली ॥२॥
उभयता बंधू अति सुंदर ।
बळिराम आणि सारंगधर ।
आणखिही गौळियांचे कुमर ।
सवंगडे भार पांच शते ॥३॥
कृष्ण लावण्य रुपाकृती ।
चंद्रसूर्या दवडी परती ।
अनंग तोहि उषभूपती ।
ऐसे सौदर्य हरिअंगी ॥४॥
लोक मिळाले भोवते ।
पाहाता धणी नपुरे त्याते ।
जाऊंचि विसरले मागुते ।
शोधले चित्ते हरिरुपा ॥५॥
आणिक एक वितले राया ।
कुब्जे चंदने चर्चिल तया ।
करुनिया ते दिव्य काया ।
ठेविली कृष्णे क्षणार्धे ॥६॥
निळा म्हणे सांगता ऐसे ।
चकित रावो निज मानसे ।
देही देहाते नुमसे ।
चित्रींचे लेप तयापरी ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग