तुझा लोभ नाही देवा ।
208.
तुझा लोभ नाही देवा । तुझी करिना मी सेवा ॥1॥
नाही अंगी थोरपण । मिथ्या धरिसी गुमान ॥2॥
रागा येउनी काय करिशी । तुझे बळ आह्मांपाशी ॥3॥
नाही सामर्थ्य तुज हरी । जनी म्हणे धरिली चोरी ॥4॥