तुझे चरणी घालीन मिठी
209.
तुझे चरणी घालीन मिठी । चाड नाही रे वैकुंठी ॥1॥
सर्वभावे गाईन नाम । सखा तूचि आत्माराम ॥2॥
नित्य पाय वंदिन माथा । तेणे नासे भवभय व्यथा ॥3॥
रुप न्याहाळीन दृष्टी । सर्व सुखे सांगेन गोष्टी ॥4॥
दीनानाथा चक्रपाणी । दासी जनी लावी ध्यानी ॥5॥
