वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

पश्चिममार्ग बापा प्र

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075149 · अभंग क्र. ४००

400.
पश्चिममार्ग बापा प्रणव की हे सांग ।
जेथे असे महालिंग तेजोमय ॥१॥
चंद्रांतील जळ ते सत्रावी केवळ ।
नादबिंदा कल्होळ गर्भी झाला ॥२॥
ज्ञानदेव म्हणे देह हा दुर्लभ ।
त्रैलोकी सुलभ भजनाचा हा ॥३॥

अर्थ :
पश्चिम मागनि प्रणवाचे ध्यान करुन योगी पुरुष महालिंगरुप ज्योतीचे दर्शन घेतो. यालाच सत्रावीच्या सरोवरातील चंद्रामृताचे पान घडून अनुहत ध्वनीचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे दुर्लभ अशा मनुष्य देहामध्ये भगवत्प्राप्ती करुन घेण्याचा भजन हा सुलभ मार्ग आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग